सूर्यग्रहण २०२०

नमस्कार मित्रांनो, आपली बोली या ब्लॉग वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज रविवार २१ जुने २०२०, आता वाजले आहेत सायंकाळचे ७:१५ आणि आपल्या ला माहितच आहे,

यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज (रविवार २१ जून) संपूर्ण भारतातून दिसले.२५ वर्षांनंतर खगोलशास्त्रज्ञांना व नागरिकांना कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची संधी मिळाली. याकाळात आपल्याला सूर्य अंगठीसारखा दिसला. याआधी १९९५ मध्ये अशाप्रकारचे ग्रहण पहायला मिळाले होते. आम्ही सुधा हे  ग्रहण आमच्या घराच्या टेरेस वरून पाहिले.हे टिपलेले छायाचित्र

सूर्यग्रहण २०२०


 
ग्रहण म्हणजे काय?

चंद्रबिंब जेव्हा सूर्यबिंबाला झाकून टाकते, त्यावेळी सूर्यग्रहण दिसते. ज्यावेळी चंद्रबिंबामुळे सूर्यबिंबाचा काही भाग झाकला जातो, त्यावेळी ‘खंडग्रास सूर्यग्रहण’ दिसते. ज्यावेळी संपूर्ण सूर्यबिंब झाकले जाते त्यावेळी खग्रास सूर्यग्रहण दिसते. खग्रास सूर्यग्रहणावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल, तर चंद्रबिंब आकाराने लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. त्यावेळी सूर्यबिंबाची गोलाकार कडा दिसते त्याला आपण ‘कंकणाकृती सूर्यग्रहण’ असे म्हणतात.

सूर्य ग्रहणात सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात. ग्रहण झाल्या नंतर काहीही खाऊ नये अशी अंधश्रद्धा आहे.पण मी यावर विश्वास ठेवत नाही.शाळेत सूर्य आणि चंद्र ग्रहण शिकवताना असे काहीही शिकवले नाही.

होप, तुम्हाला माझा पहिला ब्लॉग आवडलं असेल.जास्त काहीही बोलत नाही आणि हा ब्लॉग इथेचं समाप्त करतो.
धन्यवाद, मंडळ आभारी आहे.

सर्वांनी काळजी घ्या.
टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सविता दामोदर परांजपे