aapliboli

जगन्नाथ पुरी मंदिराचे रहस्य

भारतभर आपल्याला विविध देवतांची हजारो मंदिरे आढळून येतात. जम्मू काश्मीरमधील माता वैष्णो देवीपासून ते तामिळनाडूतील रामेश्वरपर्यंत असलेल्या मंदिरांच्या प्रतिवर्षीच्या यात्रा म्हणजे भक्तांसाठी, भाविकांसाठी, उपासकांसाठी पर्वणी असते. भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले जगन्नाथ पुरीचे मंदिर हे जगभरात प्रख्यात आहे. हे निव्वळ भारतातच नाही, तर परदेशी भाविकांसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे. मंदिराची वास्तू रचना इतकी भव्य आहे की, वास्तू शास्त्रज्ञ लांबून लांबून या विषयी शोध घेण्यासाठी येतात 

जगन्नाथ रथयात्रा ही आषाढ द्वितीयेपासून सुरू होते. या रथयात्रेची सांगता आषाढी एकादशीला होते. भगवान श्रीकृष्ण, बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा रथारूढ होऊन नगर भ्रमण करत गुंडिचा मंदिर येथे जातात.

या मंदिराशी, रथयात्रेशी निगडीत अनेक तथ्ये, रहस्ये जितकी अद्भूत आहेत, तितकीच ती अचंबित करणारी आहेत.असेच काही रहस्य आम्ही तुम्हाला ह्या ब्लॉग मध्ये सांगणार आहोत.


१.मंदिरावरील सुदर्शन चक्र

ओडिशा राज्यातील पुरी येथे भगवान जगन्नाथ यांचे भव्य मंदिर आहे. या मंदिराची उंची २१४ फूट आहे. पुरीमधील कोणत्याही ठिकाणाहून मंदिराच्या शिखरावरील असलेले सुदर्शन चक्र पाहिल्यास ते आपल्याला नेहमीच आपल्या समोरच असल्याचे दिसते. मंदिराच्या मुख्य घुमटाची सावली दिवसाच्या कोणत्याही वेळेला अदृश्य असते. जगन्नाथ यात्रेला देश-विदेशातून सुमारे ८ लाख भाविक उस्फुर्तपणे सहभागी होत असतात. जगन्नाथ यात्रा जगन्नाथपुरीला सुरू होऊ जनकपुरी येथे समाप्त होते.


२.मंदिरावरील ध्वज

जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर ध्वज नेहमीच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फडकत असतो. जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर असणारा ध्वज या शिकवणुकीला अपूर्व अपवाद आहे. हा विशिष्ट ध्वज कोणत्याही वैज्ञानिक पार्श्वभूमीशिवाय पवन कोर्सच्या उलट दिशेने उडतो. आजपर्यंत त्याचे वैज्ञानिक कारण शोधले गेले नाही; परंतु हे आश्चर्य करण्यापेक्षा कमी नाही.


३.ध्वज दररोज बदलतो

दररोज एक याजक मंदिराच्या घुमटाच्या वरचा ध्वज बदलण्यासाठी ४५ मजल्यांच्या इमारतीच्या उंचीसह मंदिराच्या भिंतींवर चढतो. खरं तर हे जरा कठीणच आहे, परंतु मंदिर बांधल्यापासून हे विधी सतत चालू आहे. कोणत्याही प्रक्रियेस कोणत्याही संरक्षणात्मक गीयरशिवाय उघड्या हातांनी दररोज पुनरावृत्ती केली जाते. असा विश्वास आहे की जर दिनदर्शिकेतील एका दिवसासाठीही हा विधी वगळण्यात आला, तर मंदिर १८ वर्षांसाठी बंद राहील.


४.समुद्राच्या लाटांचा आवाज

या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या सिंहद्वारेतून पहिले पाऊल आत टाकताच समुद्राच्या लाट्यांचा आवाज आपल्याला ऐकू येत नाही. मात्र, आपण मंदिराच्या बाहेर पाऊल टाकले की, समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकू येतो. सायंकाळी हा आवाज स्पष्टपणे ऐकू शकतो आणि अनुभवू शकतो. या मंदिरावरून एकही पक्षी किंवा विमान उडताना दिसून येत नाही. जगन्नाथ मंदिर परिसरात असलेल्या एका विशेष चुंबकीय शक्तीमुळे असे घडत असल्याची मान्यता आहे.


५.दर १२ वर्षांनी नवलेपन

भगवान जगन्नाथांच्या मूर्तींना प्रत्येक १२ वर्षांनंतर नवलेपन केले जाते. प्राथमिक प्रक्रिया पार पडल्यानंतर देवळातील पुजारी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतात. नवलेपनाची उत्तर प्रक्रिया कोणीही पाहू शकत नाही. चुकून एखाद्याने ती प्रक्रिया पाहिली, तर त्याला मृत्यू येतो, अशी मान्यता आहे. नवलेपनाची प्रक्रिया सुरू असते, तेव्हा देवतेच्या हृदयाची धडधड ऐकू येते, असा अनुभव पुजारी सांगतात. एका मान्यतेनुसार, श्रीकृष्णाला कंस मामाने मथुरेत बोलावले होते. तेव्हा श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रेसह मथुरा नगरीत गेले होते. त्याचे स्मरण म्हणून ही रथयात्रा आयोजित केली जाते, असे सांगितले जाते.


६.प्रसाद कधीही वाया जात नाही

जगन्नाथ मंदिरात वर्षभर अन्नछत्र सुरू असते. मात्र, येथे बनत असलेला प्रसाद कधीही वाया जात नाही. दररोज लक्षावधी भाविक प्रसादाचा लाभ घेत असतात. स्वयंपाकघरात अन्न शिजविण्यासाठी ७ भांडी एकमेकांवर ठेवली जातात. या प्रक्रियेमध्ये वरील भांड्याचे अन्न प्रथम शिजते आणि त्यानंतर खालील एकामागील एक एक भांड्यातील अन्न शिजते, असे सांगितले जाते. भल्यामोठ्या स्वयंपाकघरात भगवान जगन्नाथाला अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्याला बनविणारे ५०० स्वयंपाकी आणि त्यांचे ३०० मदतनीस एकत्ररीत्या काम करतात.


७.पक्षी उडत नाहीत

आम्ही पक्षी आपल्या डोक्यावर नेहमी विश्रांती घेत आणि उडताना पाहतो. परंतु, या विशिष्ट क्षेत्राला पक्ष्यांनी मनाई केली आहे. मंदिराच्या घुमटाच्या वर एकही पक्षी नाही, अगदी विमानदेखील मंदिराच्या भोवती फिरत नाही.

अजून बरेच रहस्य आहेत जगन्नाथ पुरीचे. आम्ही काही नेमके तुम्हाला सांगितले.तुम्हाला जर आमची माहिती आवडली असेल तर जरूर कॉमेंट कर. जर काही दुरुस्ती हवी असेल तरीही कमेंट करा.


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.