चाहुल मराठी मनाची मराठी जनाची lll
आपल्या परंपरतील व्रत वैकल्यांची
आपल्या घरा घरातील सणासुदीची
घरा समोर काढलेल्या सुंदर रांगोळीची
आपल्या दारात डौलाने उभ्या गुढीची
लेझीम ढोल ताशाच्या वाद्याची
चाहूल मराठी मनाची चाहूल मराठी जनाची lll
श्रावण मासाच्या, मंदिरातील भजन कीर्तनाची
आपुल्या मनांत गुण गुणणाऱ्या गीतांची
दही हंडीला एकावर एक थर रचणाऱ्या गोपालांची
लगबग गौरी गणपतीच्या सणाची
गरब्यात रंगणाऱ्या, नवरात्रीच्या दसऱ्याची
दीपावलीतील फटाक्यांच्या अतिषबाजीची
अंगणातील मनमोहक सुंदर रांगोळीची
चाहूल मराठी मनाची चाहूल मराठी जनाची lll
परंपरेत श्राद्धाना जेवणावल,सार्वपितृ आमावस्याची
आठवण आपुल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाची
नोंद ऐतिहासिक घटनांना उजाळा देण्याची
आपुल्या ऋणानुबंधाच्या स्नेह संबंधा ची
आपल्यातील गोड मिठास भाषेची
चाहूल मराठी मनाची चाहूल मराठी जनाची lll
प्रत्येक प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याची
बोबड्या लाडिक बोलणाऱ्या बाळाची
धडपड ऐशी वर्षाच्या जरर्जरर वृद्धांची
दरवळ अंगणातील चाफेच्या सुगंधाची
चव जिभेवर रेंगाळणार्या हापूस आंब्याची
चाहूल मराठी मनाची चाहूल मराठी जनाची lll
मराठी राज्य भाषा दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

चाहुल मराठी मनाची,जनाची !!!!
by
Tags:
Leave a Reply