एकवटले काळे नभ आषाढाच्या प्रथम दिनी
विक्राळ स्वरुपी नभ बरसती
वसुंधरा हिरव्या शालुत सजली
वृक्षांवरी मंजुळ गीत पक्षी गाती
नदीनाळे शुभ्र फेसात पर्वतात धावती
पवन धावतो पिकातूनी,कृषकाची गोड वाणी मधी येइ, डोंगर माथी तिरीप रवि किरणांची
नयनी साठवा, रमणीय देखावा माळ रानी
माणिक मोती सम,
अळूच्या पानी, सळसळते पाणी
रान पाखरे किलबिलती वनी
वारकऱ्यांची आषाढी पंढरीची वारी
कालिदासाचा मेघदूत,प्रेम संदेशाचे वहन करी,
इंद्र धनूची सप्तरंगी कमान काळ्या नभी
मोर पिसारा फुलवूनी थुईथुई नाचतो बनी
शुभ्र धुक्याची चादर झुळते सुसाट, कडे- कपारी
आज आषाढ महिना त्या निमित्त काही काव्य पंक्ती

आषाढ महिना
by
Tags:
Leave a Reply